-5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

पाणी व स्वच्छता’ च्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज…… प्रलंबित मागण्याकडे वेधले लक्ष…

पाणी व स्वच्छता’ च्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज……

प्रलंबित मागण्याकडे वेधले लक्ष…

बुलढाणा

मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पविञा घेतला आहे. याचाय एक भाग म्हणून (दि.८) डिसेंबरला राज्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

राज्यात बाराशेवर कंञाटी कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन नियमित होत नाही. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी छञपती संभाजीनगरच्या प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार सेवा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु शासनाकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. नियमित मानधन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी राज्याचया सर्व व्हॉट्सअप ग्रृपमधून लेफ्ट झाले आहेत. तर ८ डिसेंबरला काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार आहे. यापूर्वीही अनेकदा शासनाकडे विनंती करण्यात आली. परंतु दखल घेण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान न्याय मिळावा, अन्यथा असहकार व कामबंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या