3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका शांततेत पार — जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे योग्य काटेकोर नियोजन ठरले यशस्वी..*

*बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका शांततेत पार — जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे योग्य काटेकोर नियोजन ठरले यशस्वी..*

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुका अत्यंत शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आधीच संवेदनशील मतदान केंद्रांची ओळख करून त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. मतदानाच्या आदल्या रात्रीपासूनच जिल्ह्यात नाकाबंदी, वाहन तपासणी, संशयित व्यक्तींवर नजर तसेच पेट्रोलिंग वाढविण्यात आली होती.
प्रत्येक मतदान केंद्रावर स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तसेच महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दंगल नियंत्रण पथके, द्रुत प्रतिसाद पथके आणि मोबाईल पेट्रोलिंग पथके सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही अफवांना वा अनुचित प्रकारांना वेळीच आळा बसला.
सोशल मीडियावरून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विशेष सायबर सेलमार्फत लक्ष ठेवण्यात आले होते. अफवांवर तत्काळ कारवाई केल्याने वातावरण शांत ठेवण्यास मदत झाली.
जिल्ह्यातील नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करत शांततेत मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून मतदान केले, हे लोकशाही परिपक्वतेचे उत्तम उदाहरण ठरले.
निवडणूक प्रक्रियेनंतर बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले, “नागरिकांचे सहकार्य, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि आधीच केलेले योग्य नियोजन यामुळे निवडणुका शांततेत पार पाडता आल्या.”
एकूणच बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन, दक्षता आणि जनतेचे सहकार्य यांचे हे यशस्वी फलित ठरले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या