बुलढाणा ब्रेकिंग
रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल..
शेतातील पिके पाण्याखाली.. मका, कापूस, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान…
शेतातील विहिरी खचल्या…
काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी..
अँकर
एकीकडे राज्यात दसरा साजरा केल्या जात आहे, राजकीय नेते स्वतःच्या खेळ्या खेळताना दिसत आहे.. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची दैनवस्था झाली आहे .. संपूर्ण राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.. बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केला आहे.. मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालंय.. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे , असंख्य शेतातील विहिरि खचल्या आहेत.. मका, सोयाबीन कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेली आहे.. ही माहिती मिळताच काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सरकार कडे केली आहे..