बुलढाणा ब्रेकिंग
बुलढाण्यात शिंदेसेना विरोधात ठाकरे गटात सरळ लढत…
संजय गायकवाड विरोधात जयश्री शेळके यांच्यात सरळ लढत…
बुलढाणा विधानसभा मतदार् संघात अनेक इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .. तर महायुतीत बंडखोरी झाली होती आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता .. आज भाजपचे बंडाखोर विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज वरिष्ठणशी चर्चा करून मागे घेतला असल्याने आता शिंदेसेनेचे आ संजय गायकवाड व ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे…
बुलढाणा विधानसभा मतदार संघात घाटाखालील व घाटावरील असे दोन भाग पडतात मोताळा व बुलढाणा या दोन तालुक्याचा या विधानसभेत समावेश होतो.. जयश्री शेळके व संजय गायकवाड यांच्या काट्याची टक्कर होणार असल्याचे जण सामान्यात बोलल्या जात आहे..
15 दिवस प्रचाराचे उरले आहेत आज पासून प्रचारला सुरुवात झाली आहे… 20 नोहेंबरला मतदान व 23 ला मतमोजणी असल्याने मतदारांची उत्सुकता लागली आहे…