7.2 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

एक तर पिक विमा द्या नाहीतर शेतकऱ्याच बलिदान घ्या याच भूमिकेवर शेतकरी योद्धा कृषी समिती ठाम आता काही झालं तरी चालेल पण माघार नाही.

एक तर पिक विमा द्या नाहीतर शेतकऱ्याच बलिदान घ्या याच भूमिकेवर शेतकरी योद्धा कृषी समिती ठाम

आता काही झालं तरी चालेल पण माघार नाही.

एक वर्ष झाले पीक विम्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो संघर्ष तरी किती करावा . त्याला सुद्धा काही लिमिट आहे आम्ही आतापर्यंत शांत होतो पण आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका

दिनांक ९ डिसेंबरला जवाब मांगों आंदोलन पुकारलेला होते . याच आंदोलनासाठी काल दिनांक ५/१२ रोजी पोलीस प्रशासन यांच्याकडून मोर्च्याची परवानगी मागितली याची माहिती उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा यांना माहिती मिळताच क्षणी प्रशासन खडबडून जागे झाले आणि दिनांक १० ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजांमध्ये जवळपास ५००० हजार पेक्षा अधिक शेतकरी या मोर्चामध्ये सामील झाले होते या मोर्चाचे आयोजक शेतकरी योद्धा कृती समिती बळी वंश लोक चळवळ . युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा होते मोर्चाच्या निवेदनात दिलेल्या मागण्याचं काय झालं व शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या पावत्या दिल्या होत्या त्याचं पुढे काय केलं याचा जवाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता . यावर कार्यालयात आतापर्यंत कुठलीच माहिती संबंधित विभागाकडून आली नाही म्हणून शेतकरी योद्धा कृषी समिती व युवा संघर्ष समितीच्या वतीने ९ तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन केले होते चर्चेमधून जर मार्ग निघाला नाही तर आम्ही आंदोलनावर ठाम आहे असं या निवेदनामध्ये उल्लेख केला होता या चर्चेसाठी जिल्हा कृषी अधीक्षक पिक विमा जिल्हा प्रतिनिधी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे , त्या वेळेचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, देऊळगाव राजा तहसीलदार , तालुका कृषी अधिकारी देऊळगाव राजा सिंदखेड राजा तहसीलचे तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी सिंदखेड राजा यांना चर्चेसाठी बोलवावे अशी निवेदनामध्ये विनंती करण्यात आली होती पण .
उपविभागीय कार्यालयातून तात्काळ आदेश काढून संबंधित सर्व विभागा ला 12 डिसेंबर पर्यंत मुदत दिली तोपर्यंत तुम्ही या निवेदनावर तसेच मागण्यावर काय कारवाई केली. याची माहिती संबंधित विभागाला द्या. नाहीतर त्या बद्दलचा अहवाल जिल्हा अधिकारी कार्यालयाला देण्यात येईल असा इशाराच उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिली आहे .त्यामुळे आता 12 तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या पदरात काय पडते याकडे सर्व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे जर दिनांक १२ पर्यंत मार्ग निघाला नाही तर
पुढील आंदोलनाची तारीख 16 डिसेंबर वेळ दुपारी एक वाजता असेल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती शेतकरी योद्धा कृषी समितीने दिली आहे

Related Articles

ताज्या बातम्या