बुलढाणा
जल जीवन मिशन ची कामे देयकाची थकीत बिला अभावी रखडली. ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन…
जिल्ह्यातील सर्व कामे ठप्प, कंत्रातदार आर्थिक अडचणीत…

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे राजस्त्रिय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये राज्यभारातून २५ जिल्ह्यातील कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकी दरम्यान जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या समस्या संदर्भात निवेदन शासन दरबारी देण्याचे ठरविण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या महत्वाचे प्रश्न व अडचणी खाली नमूद करण्यात आल्या आहेत.
महोदय,
१. निधीची कमतरता :- गेल्या आठ महिन्यापासून निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे अनेक योजना या निधी अभावी बंद पडण्याचा मार्गावर आहेत.
२. सुरक्षा ठेव मिळण्याबाबत :- निधी उपलब्ध होईपर्यंत कंत्राटदारानी रोखीने भरलेली व बिलातून कपात केलेली सुरक्षा ठेव त्यांना तात्पुरत्या स्वरुपात परत मिळावी व अंतिम बिलातून ती कपात करण्यात यावी.
३. लोकवर्गणी :- जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदारानी दाखल केलेल्या देयकातून १०% लोकवर्गणी कपात केली जात आहे, अन्यायकारक असून त्या संदर्भात उचित निर्णय घ्यावा.
४. मुदतवाढ नळ पाणी पुरवठा राबवत असताना काही स्थानिक अडचणी जसे की विहीर व पाण्याची टाकी जागा उपलब्धता, महावितरण यांचेकडून विज जोडणे या कामात होणारी दिरंगाई, तसेच वन विभाग, रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नाहरकत दाखले या कारणामुळे योजना पूर्ण करण्यास विलंब होत आहे. तरी अशा सर्व योजनांना सरसकट विनादंड मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ मिळावी.
५. सुधारित अंदाजपत्रक मान्यता बर्याच योजनाचे अंदाजपत्रक त्रयस्थ खाजगी संस्थेकडून करण्यात आले होते. सदर योजनाचे अंदाजपत्रक करत असताना स्थानिक पातळीवर संपर्क न करता करण्यात आल्या असल्यामुळे योजनेमध्ये बर्याच त्रुटी आढळून आली आहेत. सदर योजना ह्या सुधारित करणे गरजेचे असल्याने त्यास मान्यता मिळावी.
६. जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पाणी पुरवठा योजना या Online व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली {I.M.I.S} प्रणालीद्वारे सानियात्रीत केली जातात. परंतु बऱ्याच योजनांच्या नोंदणीच्या प्रणालीमध्ये दिसून येत नसल्याने कंत्राटदाराचे देयक अदा केले जावू शकत नाही, त्यामुळे कामांचे देयके दोन-दोन वर्षापासून प्रलंबित आहेत.



