15.7 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

बुलडाणा शहरात ईद-उल -फितर उत्साहात साजरी

बुलडाणा शहरात ईद-उल -फितर उत्साहात साजरी

बुलडाणा :
येथील जुनागाव भागातील ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी 9 वाजता मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून ईद – उल -फितर उत्साहात साजरी केली.
नमाज पठण झाल्यावर दुवा केली.
यामध्ये मौलाना हाफिज रहेमत खान,
हाफीज मंजूर अकबरी यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. तसेच ईद ही त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले

  1. ईदगावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
    यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार नरेंद्र ठाकरे बुलडाणा शहर पोलीस स्टेशन, बोस सायक पोलीस निरीक्षक, जयसिंग राजपूत,पोलीस सायक पोलीस निरीक्षक,मधूरी, साळोनके,पोलीस निरीक्षक,
    अंमलदार रवींद्र डुकरे, सुनील दळवी, दीपक चव्हाण,उमेश घुबे, बुलडाणा तालुका विशेष शाखेचे , मिलिंद सोनुने, ,यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
    तसेच मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली. इंदिरा नगर येथील ईदगा मदिना मध्ये सकाळी 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान ईद – उल – फितर ची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर जुनागाव येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज 9 वाजता अदा करण्यात आली. दरम्यान हाफिज रहेमत यांनी नमाज अदा करून खुदबा दिला. त्यानंतर इंदिरा नगर येथील हाफिज मंजूर अकबरी यांचाही प्रवचन झाले. त्यांनी आपल्या प्रवचनात मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. संपूर्ण विश्वाच्या शांततेसाठी, रक्षणासाठी व देशात एकात्मता, बंधुभाव नांदावा यासाठी प्रार्थना केली. या ठिकाणी सामुहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ठिकठिकाणी असलेल्या कबरस्तान मध्ये जाऊन आपल्या पूर्वजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. ईद – उल – फितर शुभेच्छा देताना अनेक पक्षातील नेते मंडळी सह हाफिज खान, रहेमत अली,नदीम शेख,हाफिज मुझहिद, हाफिज वाजीद,साबीर अली, अमीन बेग, जाकीर कुरेशी,असिफ सैय्यद,अनिस बेग, हाजी बिलाल डोंगरे, सत्तार कुरेशी, शाह आवेस मुस्ताक बशीर,अनिस बेग, ॲड, राज शेख ,युसूफ खान, मोहम्मद अरिफ, , साहेबज शाह, अजर अली,मोहम्मद अशराफ, शेख रहीम, शेख आक्रम, निसार कुरेशी,समीर खान,साहेबज शाह, मुजफ्फार शाह, शौकत शाह, सर्फराज शाह, शेख अस्लम, जफर शेख, कदीर कुरेशी,मोहसीन अली आजाम बागवान,आदी शहरातील मुस्लिम बांधव, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या