3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

पिंपळगाव बुद्रुक येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न..  स्व रामजी काकड  यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिबिराचे आयोजन..

बुलढाणा

पिंपळगाव बुद्रुक येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न.. 

स्व रामजी काकड  यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिबिराचे आयोजन..

डॉ.सुरज काकड यांचे श्री गजानन हॉस्पिटल व शिव मेडीकल पिंपळगांव बु यांच्या विद्यमाने स्वर्गवासी बाबुरावजी रामजी काकड यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन सिंदखेड राजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रदीप हूसे साहेब,डाँ. मराठे साहेब,डाँ सांगळे ,डाँ रामेश्वर सानप साहेब,डाँ दरख साहेब.डॉक्टर किशोर गीते भोजने साहेब,सुदर्शन मांटे, प्रवीण ससाने ,वरद सोनुने,ज्ञानेश्वर सांगळे, स्वाती सांगळे, डॉक्टर आकाश खराडे यांचे सह संभाजीनगर आणि जालना या ठिकाणचे नामवंत डॉक्टर यांनी रुग्णाची तपासणी केली पंचक्रोशीतील व परीसरातील हजारो रुग्णांनी यावेळी तपासणी करून समाधान व्यक्त केले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्वांनी डॉक्टर सुरज काकड यांना दवाखान्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

सदर शिबीरास प्रमुख उपस्थिती म्हणून डाँ.किशोरजी गीते तालुका आरोग्य अधिकारी देऊळगांव राजा ,सौ.दिपाली रामचंद्र निकाळजे सरपंच पिंपळगांव बु,श्री रामकिसन नागरे सरपंच जळगांव यांची होती तसेच सदर शिबीरास विशेष उपस्थिती म्हणून श्री रामदास वाघ माजी उप सभापती पंस सि.राजा,श्री अशोकराव नागरे सर ,पिएस आय श्री गणेश डोईफोडे, श्री विलास विघ्णे,तसेच परीसरातील आजी-सरपंच,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व पंचकृषीतील नागरीक व पत्रकार बांधव उपस्थित होते,शिबीर सकाळी 11.00 वा ते 03.00 वा या वेळेत पार पडले,सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी समस्त गांवकरी मंडळी पिंपळगांव बु व जळगांव यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या