15.1 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

spot_img

प्रतिभावंत युवक घडविणारे भोरटेक निवासी शिबिर संपन्न. त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री संस्काराचे विद्यापीठ. हभप अमोल महाराज वक्ते.

बुलढाणा

प्रतिभावंत युवक घडविणारे भोरटेक निवासी शिबिर संपन्न.

त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री संस्काराचे विद्यापीठ.
हभप अमोल महाराज वक्ते.

मोताळा/बुलढाणा
पृथ्वी तलावरील काल्याचे किर्तन आणि काल्याचा महाप्रसाद श्रीकृष्णांच्या आत्मचरित्रातील सर्वोत्कृष्ट मानवतेचा संदेश आहे. लहान, मोठे, थोर सर्वांना एकत्र घेऊन स्नेहभोजन करण्याचा काला समानतेचा संदेश देणारा आहे. भगवंत उच्च नीच्य न पाहता भक्तांच्या भक्ती भावाला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुसंस्कार पेरण्याचे एकमेव विद्यापीठ म्हणजे त्यागमूर्ती वारकरी भूषण वासुदेव महाराज शास्त्री आहे.असे मत
हभप अमोल महाराज वक्ते तांदूळवाडी यांनी व्यक्त केले.
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था वाघजाळ,तथा श्री नळगंगेश्वर महादेव मंदिर भोरटेक द्वारा आयोजित भोरटेक येथील सुसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी 22 में ला अमोल महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी वारकरी धर्मपिठावर त्यागमूर्ती कैवल्यमूर्ती हभप वासुदेव महाराज शास्त्री,सूर्य मंदिर जयपुर संस्थांनचे भगवानदास महाराज, प्रबोधनकार ॲड सतीशचंद्र रोठे पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप गजानन महाराज गायकवाड, हभप रामभाऊ महाराज झांबरे, माधव महाराज आढाव लासुरा, वेदांत महाराज टप लासुरा, विष्णु महाराज हिवरखडे वडोदा, अनिकेत महाराज जंगले मोरखेड, तेजस महाराज आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम हभप अमोल महाराज वक्ते यांच्या काल्याच्या कीर्तनाने निवासी शिबिर समारोपय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी धर्म,संस्कार,संस्कृती अनुषंगाने विचार व्यक्त केले. शिबिरामध्ये सहभागी राज्यातील 80 विद्यार्थ्यांना टाळ, मृदंग, पाऊली,हरिपाठ, किर्तन,प्रवचन, गीता, संस्कृत आदी विषयांमध्ये एक ते तीन क्रमांक देत प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
_____
महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचे मार्गदर्शन..

22 दिवसीय निवासी शिबिरामध्ये महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्राप्त गुरुवर्य संजय महाराज पाचपोर, वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री,प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील,हभप रामभाऊ महाराज झांबरे, नांदुरा, हभप शिवदास महाराज राहणे पानेरा, हभप मोहन महाराज गारमोळे लासुरा, हभप गोपाल महाराज कचोरे, डिडोळा, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
____
दैनंदिन अध्यापकांचे सेवा कार्य..

हभप योगेश महाराज किन्होळकर,भक्तीमती जयाताई सातव जयपुर, हभप सौरभ थोरगन,हभप विठ्ठल महाराज काळे राहुड,हभप माधव महाराज आढाव लासुरा,हभप रोहित महाराज देवरे जयपूर, निनाजी महाराज खोडके भाडगणी, यांनी दैनंदिन सेवा दिली.
____
यशस्वीतेसाठी अथक परिश्रम..

समाधान पाटील, सौरभ थोरगन,ओंकार पाटील, प्रल्हाद मधुकर राऊत,दिनकर पाटील, विलास सांबारे,सतीश पाटील, कैलास घाटे, शिवशंकर चोपडे, नळगंगेेश्वर सेवाधारी भोरटेक, मधुकर दिनकर पाटील, विनोद मख, पंजाबराव घाटे, रामभाऊ मिरगे, निनाजी दळवी, विष्णू शंकर घाटे, विलास संबारे. यासह नियोजन समिती सदस्यांनी 22 दिवस अथक परिश्रम घेतले.
___
22 दिवसीय अन्नदाते.
दीपक शेळके भोरटेक, भाऊराव पाटील खराटे शेलापुर, निलेश रत्नपारखी, गजानन हरिभाऊ चोपडे डिडोळा, निनाजी माधव बुडूखले भोरटेक, गावकरी मंडळी चिंचपूर, बाळू पाटील मापारी रिधोरा, घनश्याम शेठ चांडक मोताळा, समस्त गावकरी मंडळी मोरखेड, विष्णू घाटे पिंपळपाटी, गजानन सुरपाटणे रोहिणखेड, भागवत शालिकराम घोंगटे मलकापूर, हरिदास महाले गुरुजी ज्ञानगंगापूर, समस्त गावकरी मंडळी डिडोळा खुर्द, राजेश राजाराम वनारे शिरवा, प्रल्हाद भास्कर किनगे भोरटेक, गणेश दयाराम मापारी चिंचपूर, कौतिकराव माणिकराव जुनारे मोताळा, श्रीकृष्ण पाटील शेलापुर खुर्द, प्रल्हाद पाटील गुरुजी मूर्ती, रतन लालाजी वर्मा मलकापूर, कैलास हरिश्चंद्र घाटे पिंपळपाटी,समस्त गावकरी मंडळी शेलापूर बुद्रुक,अनंता एकनाथ हिवाळे वाघजाळ, चेतन मापारी मलकापूर,मधुकर दिनकर पाटील भोरटेक, समस्त गावकरी मंडळी डिडोळा, गणेश बढे सारोळा पीर, मुक्ताई महिला मंडळ वाघजाळ, मनोहर सुपळा गवळी भोरटेक, तहसील निलेश उचाडे खामखेड, डॉ.सुभाष तलरेजा, हितेश संचेती मलकापूर, रामभाऊ झांबरे नांदुरा, महादेव मनोहर खोटाळे अकोला, पंढरीनाथ गोपाल देवरे जयपूर, ज्ञानदेव वामन थोरगन भोरटेक, सतीश हरिभाऊ पैसोडे महाल पिंपरी, कैलास भोंडेकार मोताळा, महिला भजनी मंडळ मूर्ती,घनश्याम नारायणदास चांडक मोताळा, दयाराम बोराळे मोताळा, पंजाबराव देशमुख मोताळा, योगेश नवलाखे भक्ती ऑफसेट मोताळा, समस्त गावकरी मंडळी रिधोरा. तर
दैनंदिन चहा पाणी नाश्ता शरदचंद्र पाटील मोताळा यांची दैनंदिन अनुक्रमे सकाळ संध्याकाळची अन्नदानाची सेवा दिली.
____
शिबिराला  मान्यवरांच्या भेटी..
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश महामंत्री किशोर दिकोंडवार नागपूर, विभाग उपाध्यक्ष भूपेश पाटील, भोरटेक सेवाधारी मंडळाचे सौ सुभद्राबाई पंढरी शिराळ, नंदूशेठ बुडुखुले,वासुदेव पाटील,राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गणेश पाटील, दीपक पाटील, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, वारकरी परिषदेचे प्रल्हाद मधुकर राऊत, यांच्यासह बहुसंख्य मान्यवरांनी भेटी देत शिबिराला सहकार्य केले. पसायदान आणि महाप्रसादाने शिबिराची सांगता करण्यात आली.
_
मोताळा/ बुलढाणा
दिनांक:  22 मे 2025

Related Articles

ताज्या बातम्या