4.9 C
New York
Monday, April 20, 2026

Buy now

spot_img

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना….

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना….

उद्या दिनांक ४ जून रोजी मुंबई येथे पिक विमा संदर्भामध्ये मंत्रालय मध्ये अतिशय महत्त्वाची पीक विमा संदर्भामध्ये कृषीमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित असून त्या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी अखेर रवाना..

मागील काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा येते हजारो शेतकरी घेऊन दिनांक १४ मे रोजी उपविभागीय कार्यालयावर पिक विमा व कर्जमाफी या संदर्भामध्ये भव्य मोर्चा निघाला असून तसेच लोणार तहसील कार्यालयावर मागील त्याला पिक विमा द्या मागेल त्याला कर्जमाफी द्या यासंदर्भामध्ये २६ मे रोजी शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा निघाला होता वरील दोन्ही मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या दोनच मागण्या असून अद्याप कुठलेही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्याने अखेर शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबई येथे कृषी मंत्री श्री माणिक दादा कोकाटे यांना भेटण्यासाठी अखेर रवाना….

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा.

Related Articles

ताज्या बातम्या