जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसखेड चक्का येथे इयत्ता पहिली प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा येथे
शाळेचा प्रवेशोत्सव – ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात
दि. २३ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसखेड चक्का, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांसाठी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.

गावातून नवागत विद्यार्थ्यांसह काढण्यात आली प्रभातफेरी, ज्यात पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे औक्षण करून त्यांचे शालोपयोगी साहित्य व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
नवागत विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे घेऊन या सुंदर क्षणाची आठवण जपली गेली.

माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. स्वप्निल निकम साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.
शा.व्य.स. सदस्य, अंगणवाडी सेविका, पत्रकार व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प, चॉकलेट, पाठ्यपुस्तक, गणवेश, बूट व मोज्यांचे वितरण करून नवागतांचे जंगी स्वागत करण्यात आले.
उपस्थित सर्वांना गोड भाताचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समाप्तीला सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रत्येक मूल शाळेच्या कुशीत, शिक्षण घेईल आनंदी मनात!”
शाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षकवृंद, पालक, आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार! या वेळी उपस्थित विद्यार्थीश्रुती प्रताप बागल, सानिका अशोक खजुरे, कल्याणी काकडे, प्राची आंधळे, प्रगती मुंढे, सोहम दूंडियार, यश मांदळे, साई जायभाये, वरद मुंढे, सोहम सोसे व अनेक विद्यार्थी



