4.1 C
New York
Tuesday, April 21, 2026

Buy now

spot_img

अतिवृष्टीचे अग्रीम सानूग्रह अनुदान देऊन सरसगट नुकसान भरपाई द्या नसतात तीव्र आंदोलन छेडू — प्रो. डॉ. गोपाल बच्छिरे

अतिवृष्टीचे अग्रीम सानूग्रह अनुदान देऊन सरसगट नुकसान भरपाई द्या नसतात तीव्र आंदोलन छेडू —
प्रो. डॉ. गोपाल बच्छिरे

लोणार तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यास पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सरसकट अग्रीम सानूग्रह अनुदान मंजूर करून, युद्ध पातळीवर शेती व घरांच्या पडझडीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई द्या नसता शिवसेना उ.बा.ठा. पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जिल्हा संघटक प्रो.डॉ.गोपाल बच्छिरे यांनी लोणार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना दिला.

लोणार तालुक्यातील पांगरा डोळे, हिरडव, सुलतानपूर, बीबी व लोणार शहर परिसरातील पाचही मंडळात सोमवार २१ जुलै रात्री ढगफुटी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारे फुटून उभे पीक असलेल्या हजारो हेक्टर शेतीतील माती खरडून वाहून गेलेली आहे कित्येक शेतकऱ्यांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले आहे हे सर्व आम्ही स्वतः संपूर्ण अतिवृष्टी ग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघितले आहे, यापूर्वीही दोनदा अतिवृष्टी झालेली आहे शासन प्रशासनाने फक्त पंचनामे करण्याचे ढोंग करून कोणतीही नुकसान भरपाई न देता वेळ मारून नेलेली आहे, म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम सानूग्रह अनुदान मंजूर करावे व युद्ध पातळीवर पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, त्याचबरोबर टिटवी, देऊळगाव कुंडपाळ व गुन्धा येथील लघु पाटबंधारे प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे त्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकल्पाच्या भिंतीला भगदाड पडले आहे वेळीच उपाययोजना करावी नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा संघटक प्रो.डॉ.गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानभवनात कामकाजाच्या वेळी रमी खेळणारे कृषी मंत्री यांना देण्यात आले आहे याप्रसंगी शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुकासंघटिका तारामती जायभाये, महिला शहरसंघटिका शालिनीताई मोरे, उपसरपंच रवींद्र सुटे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी,ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग घोडके, प्रकाश सानप, श्याम राऊत, सुदन अंभोरे, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, युवा तालुका उपाधिकारी अमोल सुट्टे, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, विजय घोडके, मंगेश मोरे, विलास कालापाड, गोपाल मापारी, संजय सुभेदार, अल्पसंख्यांक चे अशफाक खान, फहीम खान, अभिजीत जाधव, छत्रभुज फोलाने, गजानन चाटे, उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या