बुलढाणा
माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी घेतली माळेगाव येथे आदिवासियांची भेट…
वृद्ध आदिवासी महिलेने माजिमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासमोर अत्याचाराचा पाढाच वाचून दाखवला

वन जमिनीवर 35 वर्षांपासून राहत असलेल्या 400 लोकांवर वन विभागाने धडक कारवाई करीत त्या ग्रामस्थांचे ऐन पावसाळ्यात घरे उध्वस्त केली.. भिल्ल समाजाचे वास्तव तसे जंगलातच, आदिवासी आजही सर्व जंगलातच राहतात हे आदिवासी भिल्ल समाजाचे माळेगाव येथे 35 वर्षांपासून अतिक्रमण करून राहत होते.. वन विभागाने त्यांचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेत महसूल विभाग व पोलीस विभागाची मदत घेत माळेगावातील राहत असलेल्या आदिवासियांचे घरांचे अतिक्रमन उध्वस्त केले याप्रसंगी बरच गोंधळ उडाला होता त्यात 40 आदिवासियावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत… आदिवासियांना निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने जिल्हाधिकारि यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली होती.. मात्र तोडगा निघाला नसल्याने माळेगावातील आदिवासी शासन दरबारीं चकरा मारत आहेत.. अश्यातच माजी आदिवासी व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माळेगाव येथे जाऊन त्या अत्याचार झालेल्या आदिवासियांची भेट घेतली व शासनाने आदिवासियावर अन्यायच केला आहे.. मी आता वन मंत्री यांना भेटणार असून माळेगावातील आदिवासियांना नक्कीच न्याय मिळवून देईल् असे आश्वासन त्यांनी माळेगाववासियांना दिले.. यावेळी मालेगांवातील असंख्य आदिवासी महिला उपस्थित होत्या तर एका वृद्ध आदिवासी महिलेने शिवाजीराव मोघे यांच्या समोर घडलेल्या अत्याचाराचा पाढा वाचून दाखवीला, पोलिसांनी महिलांना घरातून ओढून मारले, तसेच आमच्या पुरुषावर लाठीचार्ज केल्याचा आरोप सुद्धा त्या महिलेने केलाय… .. यावर माजीमंत्री शिवाजीराव मोघे हे भावूक् झाल्याचे दिसून आले… यावेळी सम्राट संघटनेचे आशिष खरात, आदिवासी समाजाच्या नेत्या नंदिनी टारपे , रवी मोरे, यांच्यासह आदी नेते मंडळी उपस्थित होते…



