2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात एकच आवाज — संजूभाऊ गायकवाड!” ; शिवसेना शिंदे गटाच्या पुजाताई गायकवाड प्रचंड मताधिक्याने विजयी…

  • बुलढाण्यात एकच आवाज — संजूभाऊ गायकवाड!” ; शिवसेना शिंदे गटाच्या पुजाताई गायकवाड प्रचंड मताधिक्याने विजयी…

बुलढाणा

बुलढाणा नगर परिषद / विधानसभा क्षेत्रातील राजकीय चित्र बदलवत शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. “बुलढाण्यात एकच आवाज — संजूभाऊ गायकवाड!” या घोषणेने संपूर्ण प्रचार रणधुमाळीत बदलला होता आणि अखेर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पुजाताई संजय गायकवाड यांनी भाजप व काँग्रेसचा दारुण पराभव करत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला.


या विजयामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाण्यात शिंदे सेनेचा दबदबा कायम राहिला आहे. विरोधकांच्या सर्व समीकरणांना छेद देत जनतेने पुन्हा एकदा संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत आमदार संजय (संजूभाऊ) गायकवाड यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत प्रचार यंत्रणा राबवली.

प्रभागनिहाय संपर्क, बूथ कमिटींची मजबूत रचना, महिला, युवक व व्यापारी वर्गाशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार, आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या सर्व बाबींमुळे शिंदे सेनेचा प्रचार अत्यंत परिणामकारक ठरला.


विजयानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळण आणि घोषणा यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले.


विजयानंतर बोलताना पुजाताई गायकवाड म्हणाल्या, “हा विजय जनतेचा आहे. महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शहराचा विकास ही माझी प्राथमिकता असेल. संजूभाऊंच्या नेतृत्वाखाली बुलढाण्याचा विकास आणखी वेगाने होईल.”


आमदार संजय गायकवाड यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले, “हा विजय संघटनेचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जिवाचे रान करत काम केले. बुलढाणा शहराचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.”
या निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठा संदेश गेला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा विजय शिंदे सेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या