28.3 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img

अन्न व औषध प्रशासन झोपेत असताना वन विभागाची मोठी कामगिरी; जळगावजामोद येथे ७५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!..*

बुलढाणा ब्रेक

*अन्न व औषध प्रशासन झोपेत असताना वन विभागाची मोठी कामगिरी; जळगावजामोद येथे ७५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!..*

जळगावजामोद येथे वन विभागाने धाडसी कारवाई करत तब्बल ७५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असताना वन विभागाने पुढाकार घेऊन केली, यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा प्रतिबंधित गुटखा मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या वाहतूक करून आणला जात होता. गुप्त माहितीनुसार वन विभागाच्या पथकाने सापळा रचून ही मोठी खेप पकडली. कारवाईदरम्यान गुटख्याने भरलेले वाहन ताब्यात घेऊन त्यातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे एकीकडे वन विभागाचे कौतुक होत असले तरी दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका होत आहे. राज्यात प्रतिबंध असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा कसा येतो, कोणाच्या आशीर्वादाने येतो, आणि याकडे संबंधित विभागाने वेळेवर लक्ष का दिले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या