30.4 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

पाम तेल विक्रीवर कुठेही बंदी नाही – अन्न व औषध प्रशासनाचा खुलासा; जिल्ह्यात मनुष्यबळाची तीव्र कमतरता*

बुलढाणा ब्रेकिंग

*पाम तेल विक्रीवर कुठेही बंदी नाही – अन्न व औषध प्रशासनाचा खुलासा; जिल्ह्यात मनुष्यबळाची तीव्र कमतरता*

अँकर
पाम तेलाच्या विक्रीवर कुठेही बंदी नसल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांमधील गैरसमज दूर केला आहे. सध्या बाजारात विक्री होत असलेल्या खाद्यतेलामध्ये कुठेही भेसळ आढळून आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे….
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्यात खाद्यतेल विक्रीसंदर्भात नियमित तपासण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 31 कारवाया करण्यात आल्या असून, त्यापैकी 8 प्रकरणांमध्ये प्रमाणित स्पष्टता (क्लीन चिट) देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये आवश्यक तपासणी व कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. 13 तालुक्यांचा जिल्हा असतानाही केवळ तीनच अन्न अधिकारी सध्या कार्यरत आहेत. नियमानुसार जिल्ह्यात किमान 13 तपासणी अधिकारी असणे अपेक्षित असताना, अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासणी, कारवाई आणि जनजागृतीवर मोठा ताण येत आहे.
या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक ठरत असून, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विभागाकडे शासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी संख्येची कमतरता भरून काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले की, पाम तेलाबाबत कोणतीही बंदी नसली तरी नियमांचे उल्लंघन, भेसळ किंवा दर्जाहीन खाद्यपदार्थ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी संशयास्पद खाद्यपदार्थ किंवा भेसळीबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या