29.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांची भव्य लाडूतुला; शहरातील मान्यवर व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…*

बुलढाणा

*नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांची भव्य लाडूतुला; शहरातील मान्यवर व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…*

बुलढाणा नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ. पूजाताई संजय गायकवाड यांचा भव्य सत्कार व लाडूतुला सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लोकराजा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष श्री. राहुल रामकृष्ण सुरडकर तसेच नगरसेविका सौ. वैशालीताई राहुल सुरडकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य सोहळ्यास आमदार संजय गायकवाड, नगरपालिकेचे गटनेते व युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सन्मानार्थ आयोजित लाडूतुला हा कार्यक्रम शहरात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला…
सत्कार समारंभासाठी शहरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक, माता-भगिनी, समाजसेवी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी सौ. पूजाताई गायकवाड यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सौ. पूजाताई गायकवाड यांच्या नेतृत्वगुणांचे, सामाजिक जाणिवेचे व नगरविकासासाठी असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रशासन यांच्या समन्वयातून शहराच्या विकासाला गती देण्याचे आवाहन केले. तसेच युवा गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी तरुणाईला विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
हा लाडूतुला व सत्कार सोहळा शहरातील राजकीय व सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला असून, नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक उत्साह निर्माण झाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या