2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

*“125 रुपयांत 26 पदार्थांचे आमिष अन् फसवणूकच फसवणूक! बुलढाण्यातील शिवगड लॉन्सवर हजारो ग्राहकांची फसवणूक”*

बुलढाणा ब्रेकिंग

*“125 रुपयांत 26 पदार्थांचे आमिष अन् फसवणूकच फसवणूक! बुलढाण्यातील शिवगड लॉन्सवर हजारो ग्राहकांची फसवणूक”*

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागरिकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करून बुलढाण्यातील शिवगड लॉन्स व्यवस्थापनाने थेट ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. फक्त 125 रुपयांत तब्बल 26 खाद्यपदार्थ देण्याचे भव्य आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही ऑफर केवळ कागदावरच असल्याचे उघड झाले असून, हजारो कुटुंबांची अक्षरशः फसवणूक झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवगड लॉन्स येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. सोशल मीडिया, बॅनर्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून 125 रुपयांत 26 पदार्थांची घोषणा करण्यात आल्याने नागरिकांनी बुकिंग करून कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र लॉन्समध्ये प्रवेश करताच ग्राहकांना अपुऱ्या खाद्यपदार्थांचा, निकृष्ट दर्जाचा आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचा सामना करावा लागला…..


अनेक खाद्यपदार्थ उपलब्धच नव्हते, तर जे होते ते अत्यल्प प्रमाणात देण्यात आले. रांगा, गोंधळ, अराजकता यामुळे महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळातच संतप्त ग्राहकांनी शिवगड लॉन्स व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत फसवणूक झाली असल्याचा आरोप केला.
ग्राहकांनी तात्काळ पैसे परत देण्याची मागणी केली असता, व्यवस्थापनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. परिणामी वातावरण तणावपूर्ण बनले. अनेक नागरिकांनी हा प्रकार ग्राहकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे….
*या प्रकरणात आता प्रशासन आणि ग्राहक संरक्षण विभागाने तात्काळ लक्ष घालून शिवगड लॉन्स व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी,* अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा फसव्या ऑफरच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट थांबणार कशी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या