4.5 C
New York
Monday, April 20, 2026

Buy now

spot_img

खडकपूर्ण नदीपात्रात जेसीबीने खुलेआम रेती उपसा!*…. *प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफियांची वाहतूक सुरू..*… *महसूल विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष उघड.

बुलढाणा ब्रेकिंग

*खडकपूर्ण नदीपात्रात जेसीबीने खुलेआम रेती उपसा!*….

*प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफियांची वाहतूक सुरू..*…

*महसूल विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष उघड..*

सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्ण नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असून, जेसीबीसारख्या अवजड यंत्रांच्या साहाय्याने दिवसाढवळ्या रेती काढली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफिया खुलेआम रेती वाहतूक करत असल्याने महसूल प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे…नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा केल्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा धोका निर्माण झाला असून, परिसरातील शेती, भूजल पातळी व पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळेसच नव्हे तर दिवसा देखील जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती काढली जात असताना महसूल व पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही…स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या महसूल विभागाचे या संपूर्ण प्रकरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने रेती माफियांचे मनोबल वाढले असून, कायद्याची भीतीच उरलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे…जर तातडीने कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर भविष्यात खडकपूर्ण नदीपात्रासह संपूर्ण परिसराला मोठ्या पर्यावरणीय हानीला सामोरे जावे लागेल. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या