23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

शेगाव नगरी भक्तीमय! श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रगट दिन; लाखो भाविकांची मांदियाळी, दिंड्यांचा जयघोष”*

बुलढाणा

*शेगाव नगरी भक्तीमय! श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रगट दिन; लाखो भाविकांची मांदियाळी, दिंड्यांचा जयघोष”*

आज शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रगट दिन उत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त शेगाव नगरी पूर्णतः भक्तीमय झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. कालपासूनच महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून, मंदिर परिसरात भाविकांची अखंड रांग आणि “गण गण गणात बोते”चा जयघोष घुमत आहे….या वर्षी राज्यभरातून जवळपास 700 हून अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून अंदाजे तीन ते चार लाख भाविकांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावली आहे. आज सकाळी सात वाजता प्रहराची आरती होऊन प्रगट दिन उत्सवाची विधिवत सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर अभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी दर्शन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव सोहळा संपन्न होत आहे.
प्रगट दिनानिमित्त भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रद्धा, भक्ती आणि चैतन्याने भारलेला हा दिवस अनुभवण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मंदिर परिसर, दर्शन रांगा, दिंड्या, भगव्या पताका आणि भक्तांच्या घोषणांमुळे संपूर्ण शेगाव शहर उत्सवमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे… संस्थान प्रशासनाकडून दर्शन, स्वच्छता, सुरक्षा, पाणी व आरोग्य सुविधांचे योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एकूणच श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रगट दिनानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळत आहे. …

Related Articles

ताज्या बातम्या