2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात लॉर्ड बुद्ध चॅनलच्या जिल्हा कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ;…* *सत्य इतिहास मांडणाऱ्या विचारमंचाला नवे बळ…*

बुलढाणा

*बुलढाण्यात लॉर्ड बुद्ध चॅनलच्या जिल्हा कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ;…*

*सत्य इतिहास मांडणाऱ्या विचारमंचाला नवे बळ…*

संपूर्ण राज्यासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लॉर्ड बुद्ध वृत्त वाहिनीच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन चॅनल हेड सचिन मून यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी अभिता अ‍ॅग्रो लँड कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी शुभेच्छा देत लॉर्ड बुद्ध चॅनलच्या वैचारिक भूमिकेचे विशेष कौतुक केले…. लॉर्ड बुद्ध चॅनल हे केवळ वृत्तवाहिनी नसून, सत्य, विचार आणि इतिहासाचे वास्तव दर्शन घडवणारे माध्यम असल्याचे मत सुनील शेळके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अलीकडच्या काळात इतिहासाची जाणीवपूर्वक तोडमोड केली जात असताना, त्या विरोधात ठाम भूमिका घेत सत्य इतिहास समाजासमोर मांडण्याचे कार्य लॉर्ड बुद्ध चॅनल करत आहे, असे त्यांनी सांगितले….
राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात आतापर्यंत लॉर्ड बुद्ध चॅनलचे जिल्हा कार्यालय नव्हते. मात्र परमेश्वर गवई यांच्या पुढाकारातून आज बुलढाण्यात जिल्हा कार्यालय सुरू होत असल्याने, या माध्यमाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वासही सुनील शेळके यांनी व्यक्त केला. हे कार्यालय अखंडपणे सुरू राहो, अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या….
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा कार्यालय प्रमुख परमेश्वर गवई, चॅनल हेड सचिन मून, अभिता लँड कंपनीचे सीईओ सुनील शेळके, राणेश घेवंन्दे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. बुलढाण्यात लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून सत्य, विचारशील पत्रकारितेला नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती….

Related Articles

ताज्या बातम्या