6.7 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा शहरात ४ कोटी ४९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ…. आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड व नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते विविध प्रभागांत भूमिपूजन..

बुलढाणा

बुलढाणा शहरात ४ कोटी ४९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ….
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड व नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते विविध प्रभागांत भूमिपूजन..

बुलढाणा

बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ४ कोटी ४९ लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते तसेच नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध प्रभागांमध्ये या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.
शहरातील रस्ते डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे, नाली बांधकाम, सीडी वर्क, सार्वजनिक शौचालय उभारणी व परिसर सुशोभीकरण अशा विविध कामांचा यात समावेश असून या कामांमुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधील गणेश नगर येथे श्री हनुमान मंदिरासमोरील जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी २५.१० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून दुर्वांकुर नगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३०.४७ लाख रुपये खर्च होणार आहेत. कऱ्हाळे ले-आऊट जोड रस्ता डांबरीकरण तसेच श्री विशाल लांडे यांच्या घरासमोरील खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये ८९.८२ लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम होणार असून प्रभाग क्रमांक ११ मध्ये राणा गेस्ट हाऊस समोरील रस्ता, डॉ. सवडतकर यांच्या घरासमोरील रस्ता तसेच सुवर्ण नगरमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण ४६.६५ लाख रुपयांत करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील जयस्वाल लेआउट परिसरात श्री कुंदन राजपूत ते श्री जयंत सोनुने यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण तसेच श्री गजानन महाराज मंदिरासमोर सिमेंट रस्ता बांधकामासाठी ३४.६१ लाख रुपये मंजूर आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधील केशवनगर येथे ९.४० लाख रुपयांत रस्ता डांबरीकरण होणार आहे.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये विविध भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण ३२.०१ लाख रुपयांत होणार असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये गणपती मंदिरासमोर १८.९२ लाख रुपयांत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथे २०.८० लाख रुपयांचे रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे.
तसेच प्रभाग क्रमांक १४ मध्ये महावितरण कार्यालय ते श्री जायभाये यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली व सीडी वर्कसाठी ३८.८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अष्टविनायक नगर येथे ४९.६३ लाख रुपयांत सार्वजनिक शौचालय उभारणीसह परिसर विकास व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय विकास खक्के व कुळे यांच्या घरापासून ते श्री कोलते यांच्या घरापर्यंत ३२.८८ लाख रुपयांत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात येणार आहे.
या प्रसंगी युवानेते मृत्युंजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे… यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, नगरपालिकेचे सभापती, नगरसेवक व शिवसैनिक तसेच संबंधित प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहर विकासाच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय..

Related Articles

ताज्या बातम्या