2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

चार श्रम संहितांविरोधात बुलढाण्यात ‘सिटू’चे जोरदार निदर्शने…* *महिला कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले..* *भारत बंदला पाठिंबा; आशा, गटप्रवर्तक, पोषण आहार व परिचारिका संघटनांचा सहभाग..* *कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी…*

बुलढाणा

*चार श्रम संहितांविरोधात बुलढाण्यात ‘सिटू’चे जोरदार निदर्शने…*

*महिला कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले..*

*भारत बंदला पाठिंबा; आशा, गटप्रवर्तक, पोषण आहार व परिचारिका संघटनांचा सहभाग..*

*कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी…*

केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या चार श्रम संहितांच्या (लेबर कोड) विरोधात अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटनांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत बुलढाण्यात ‘सिटू’ (CITU) संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला… या आंदोलनात आशा कार्यकर्त्या, गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार संघटना, परिचारिका संघटना तसेच सिटूशी संलग्न विविध कामगार संघटनांतील महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. देशभरात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली असून बुलढाण्यातील हे आंदोलन त्याचाच एक भाग होते.
निदर्शनांदरम्यान कामगारांच्या हिताचे जुने कायदे लागू ठेवावेत, कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तसेच श्रम संहितांमुळे कामगारांचे हक्क कमी होणार असल्याचा आरोप करत त्यांना रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण तापले होते. सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला…

Related Articles

ताज्या बातम्या