2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

लग्नसमारंभात रक्तरंजित वाद!…* *जुन्या भांडणातून चाकू हल्ला …तरुण गंभीर जखमी;..आरोपी फरार, गुन्हा दाखल…*

बुलढाणा ब्रेकिंग

*लग्नसमारंभात रक्तरंजित वाद!…*

*जुन्या भांडणातून चाकू हल्ला …तरुण गंभीर जखमी;..आरोपी फरार, गुन्हा दाखल…*

लग्नाच्या आनंदी वातावरणाला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कोलवड येथे घडली. कावड यात्रेदरम्यान झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभातच तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून आरोपी फरार आहेत. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन जाधव (वय २६, रा. कोलवड) हा गावातील शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित होता. लग्नसोहळा पार पडून पंगतीत जेवण सुरू असताना त्याचा गावातील नितीन सपकाळ याच्याशी वाद झाला. काही दिवसांपूर्वी कावड यात्रेदरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची पार्श्वभूमी असून त्याच कारणावरून पुन्हा वाद चिघळल्याचे तक्रारीत नमूद आहे… वाद वाढताच आरोपी नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू घेत गौरव जाधव याच्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेले अरुण सुभाष जाधव यांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. तक्रारीनुसार या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. कदम करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे….

Related Articles

ताज्या बातम्या