19.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

नांदुरा जवळ धावत्या बसला भीषण आग; प्रसंगावधानामुळे ३० प्रवाशांचे प्राण वाचले

बुलढाणा ब्रेकिंग
नांदुरा जवळ धावत्या बसला भीषण आग; प्रसंगावधानामुळे ३० प्रवाशांचे प्राण वाचले

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर इंदोरहून अकोलाकडे जात असलेल्या धावत्या खाजगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नांदुरा जवळ घडली. या आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने बसमधील सुमारे ३० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले.


मिळालेल्या माहितीनुसार, NL 07 B 0694 क्रमांकाची खाजगी बस इंदोरहून अकोला दिशेने प्रवास करत होती. बस नांदुरा परिसरात पोहोचताच अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक मंदावली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या