26.4 C
New York
Tuesday, August 11, 2026

Buy now

spot_img

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या अवैध वापरावर कारवाई* > • तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय पथके > • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

*इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या अवैध वापरावर कारवाई*
> • तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय पथके
> • नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून गॅस इंधनाच्या दरात वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे तसेच त्याचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा व तालुकास्तरीय दक्षता व फिरते पथक स्थापन करण्यात आले असून ही पथके अचानक तपासणी करणार आहेत.

शासन निर्णयान्वये घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय दक्षता व फिरते पथक स्थापन करण्यात आले असून ही पथके गॅस एजन्सींची अचानक तपासणी (सप्राईज इन्स्पेक्शन) करणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी इंधनाचा अवैध साठा किंवा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा इतर अवैध कामांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घरगुती गॅसचा आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या