19.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात शिवसेनेला महिलांचा मोठा प्रतिसाद;…* *भाजपा महिला आघाडीच्या नीताताई देशपांडे यांच्यासह शेकडो महिलांचा शिंदेसेनेत प्रवेश…*

*बुलढाणा ब्रेकिंग …*

*बुलढाण्यात शिवसेनेला महिलांचा मोठा प्रतिसाद;…*

*भाजपा महिला आघाडीच्या नीताताई देशपांडे यांच्यासह शेकडो महिलांचा शिंदेसेनेत प्रवेश…*

बुलढाणा शहरात शिवसेना (शिंदे गट) पक्षाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून भाजपा महिला आघाडीच्या सक्रिय कार्यकर्त्या नीताताई उदय देशपांडे यांच्यासह शेकडो माता-भगिनींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सागवन परिसरासह बुलढाणा शहरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शिवसेनेच्या विचारसरणीशी निष्ठा व्यक्त केली. या प्रवेशामुळे बुलढाणा शहरात शिवसेनेची ताकद वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये ममता किशोर धामणेकर, कल्पनाताई किशोर कुल्ली, प्रीती किशोर ठाकरे, अंजली प्रकाश मोहिते, सविताताई चव्हाण, मंदाताई भोपळे, वनिताताई विजय सुरगडे, शुभ्राताई समीर पाटील, वर्षाताई रवींद्र बोबडे, शोभाताई प्रमोद लव्हाळे, अश्विनीताई आशुतोष वाईकर, जयश्रीताई शामसुंदर भागवत, इंदिराताई खर्चे, सुमित्राताई देशमुख, शितलताई वाघ, विमलताई पालकर, सुनिताताई लोहकरे यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता.
हा कार्यक्रम बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत महिलांच्या वाढत्या सहभागामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, विधानसभा समन्वयक पद्माताई परदेशी, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, नगरपालिका सभापती इंदुताई शामराव घट्टे, महिला आघाडी शहर प्रमुख मयुरीताई देशपांडे, शुभांगीताई देशपांडे, नगरसेवक उदयदादा देशपांडे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, सौरभ राठोड यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा शहरात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र दिसून येत असून महिलांचा वाढता सहभाग पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या