19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्ह्यात हरवलेल्या महिलांचा 87% घेतला शोध; जिल्हा पोलिसांची प्रभावी कारवाई..*

बुलढाणा

*बुलढाणा जिल्ह्यात हरवलेल्या महिलांचा 87% घेतला शोध; जिल्हा पोलिसांची प्रभावी कारवाई..*

बुलढाणा जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला हरविण्याच्या घटना वाढत असतानाच जिल्हा पोलिस दलाने अशा प्रकरणांच्या तपासात मोठे यश मिळवले आहे. वर्ष 2025 मध्ये नोंद झालेल्या हरवलेल्या महिलांपैकी तब्बल 87 टक्के महिलांचा शोध घेण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे… जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे “महिला मिसिंग डेस्क” स्थापन करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” कार्यान्वित करण्यात आले आहेत… महिला मिसिंग डेस्क आणि मिसिंग सेल यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय ठेवून हरवलेल्या महिलांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून वर्ष 2025 मध्ये नोंद झालेल्या महिला मिसिंग प्रकरणांपैकी 87 टक्के महिलांचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे… तसेच सन 2021 पासून आतापर्यंत हरवलेल्या महिलांच्या 284 प्रकरणांची नोंद असून या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे. उर्वरित महिलांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पोलिसांमधील समन्वय आणि विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून नागरिकांनीही अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या