19.3 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

जिल्ह्यात इंधन टंचाई नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई-​जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*…  साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध पथके तैनात

*जिल्ह्यात इंधन टंचाई नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई-​जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*…

 साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध पथके तैनात

बुलढाणा

आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक तत्त्वांकडून पसरवल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

काही ठिकाणी घरगुती गॅसची बेकायदेशीर साठवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके स्थापन केली आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत आता अशा साठेबाजांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंधन कंपन्यांच्या (BPCL, HPCL व IOCL) माध्यमातून जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे टंचाईची कोणतीही स्थिती निर्माण झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच इंधन खरेदी करावे आणि कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इंधन पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास किंवा कुठे साठेबाजी व काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी ​नैसर्गिक आपत्ती कक्ष, बुलढाणा किंवा ​दूरध्वनी क्रमांक: ०७२६२-२४२६८३ वर तात्काळ संपर्क साधावा.

Related Articles

ताज्या बातम्या