14.9 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई : बारा शिक्षक, दोन ग्रामसेवकांसह परिचर निलंबित…*

बुलढाणा ब्रेकिंग

*बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई : बारा शिक्षक, दोन ग्रामसेवकांसह परिचर निलंबित…*

बुलढाणा जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी व शासकीय लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर तब्बल १२ शिक्षक, २ ग्रामसेवक आणि १ परिचर यांना निलंबित करण्यात आले आहे….
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र (यूडीआयडी) नसतानाही काही कर्मचाऱ्यांनी स्वतःला दिव्यांग दाखवत शासकीय लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीच्या तपासात अनेक कर्मचाऱ्यांकडे यूडीआयडी कार्ड नसल्याचे तसेच काही प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर संशय निर्माण झाला.

प्रशासनाची कडक भूमिका
तपास अहवाल सादर झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित १५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच पुढील चौकशी सुरू असून दोषींवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,
बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांवर शून्य सहनशीलता धोरण राबवले जाईल…
सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पुन्हा तपासणी केली जाणार..
दोषी आढळल्यास सेवा समाप्तीपर्यंत कारवाई होऊ शकते….

या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली असून, प्रामाणिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या