बुलढाणा
हरियाणाचा पवन दहीया व नगरच्या सागर कोल्हे ची अंतिम कुस्तीची झुंझ अनिर्णित…
देऊळगाव महीत रंगला कुस्त्यांचा चित्तथरार फड
नंदी महादेव संस्थान टेकडीवर गुढीपाडवा चैत्र उत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे कुस्त्यांची दंगल यावर्षीही गाजली.राज्याच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या मल्लानी दिवसभर आपल्यातील कुस्तीच्या पैलूची चुनुक दाखवीत कुस्तीप्रेमीं च्या अंगावर शहारे आणले. देऊळगाव महीच्या आखाड्याचे नाव गल्ली ते दिल्ली,हरियाणा पर्यंत गाजल्याचा प्रत्यय यावेळी आला. मनाची शेवटची कुस्ती खेळण्यासाठी हरियाणा येथील मल्ल पवन दहीया व नगर येथील सागर कोल्हेब यांनी अंतिम विजेता ठरवण्यासाठी लाल मातीत रंगलेल्या चित्त थरारक व काळजाचे ठोके वाढवणारा शेवटची कुस्तीला शोभेल असे डावपेच पाहायला मिळाले. भरपूर वेळ चाललेले कुस्तीत दोन्ही मल्ल घामाघुम झाले होते. पंधरा हजार रुपयांची अंतिम कुस्तीची झुंज पंच कमिटीने कालनिर्णय सोडत दोघांनाही बक्षीस समसमान दिले. गुढीपाडवा या मराठी चैत्र नवं वर्षाच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गावाच्या परंपरा सुरू ठेवून नुकतीच कुस्त्याची दंगल रंगली.आजचा युवक हा दारू,बिडी,सिगारेट,तंबाखू,गुटखा या सारख्या महा भयंकर व्यसनापासून मुक्त झाला पाहिजे.या उद्देशाने गावकऱ्यांनी नंदी महादेव टेकडीवर संस्थाच्या भव्य प्रागणात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रतील विदर्भ ,मराठवाडासह, मध्यप्रदेश, दिल्ली,हरयाणा सारख्या राज्यातून असंख्य मल्लानीं कुस्ती खेळण्यासाठी उपस्थिती लावली होती. कुस्त्यांच्या दंगलीत तिन लाख रुपयांची लूट करण्यात आली. या दंगलीचे उद्घाटन नारळ व अकरा रुपयापासून करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरदादा शिंगणे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ बापू शिंगणे, शिवसेना नेते गणेश शिंगणे, भाजपा नेते गणेश नागरे, सरपंच वसुदेव पाटील शिंगणे,माजी सरपंच उमेश शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर शिंगणे, अनिल शिंगणे माजी सरपंच,शेख सय्यद सईद, ना.खेड सरपंच दशरथ चेके, शेख अहेमद नागणगांव वाले,मोहम्मद सादिक, सुभाष शिंगणे,मोहम्मद कलीम,भारत शिंगणे,बळीराम शिंगणे,अनिल शिंगणे,किशोर शिंगणे, पुरुषोत्तम राजेंद्र शिंगणे,पत्रकार अमोल बोबडे, सुरेश झिने, यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांचे दंगल खेळण्यासाठी हरियाणा,दिल्ली, बुलढाणा, यवतमाळ, खंडवा, औरंगाबाद, जालना,बीड,परभणी,येथील नामवंत मल्ल दाखल झाले होते. मल्लांनी आपआपले डावपेच दाखवीत विरोधी मल्लांना धूळ चारली कुस्त्याची दंगल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी तिन लाख रुपयांची जंगी लुट करण्यात आली.कुस्त्यांचे फड यशस्वी होण्यासाठी पंच कमिटीचे तुकाराम महाराज शिंगणे, शेख निसारशेठ शेख यासीन,रवींद्र इंगळे, एकनाथबाप्पू शिंगणे,मन्नान पठाण,राजेंद्र शिंगणे,कडूबा शिंगणे,डिंगाबर शिंगणे,प्रशांत पाटील शिंगणे, राजेंद्र शिंगणे माजी सैनिक, संतोष जोशी, श्रीकृष्ण शिंगणे, बळीराम शिंगणे, यांनी पंच कमिटी म्हणून काम पाहिले तर कुस्त्याची दंगल यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. कुस्त्यांचे दंगलीचे सूत्र संचालन प्रशांत पाटील यांनी केले



