16.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

युवकांनी व्यसन टाळून कुस्ती सारख्या खेळाकडे वळावे…. कुस्ती मैदानात एकनाथबापू शिंगणे यांचे प्रतिपादन..

युवकांनी व्यसन टाळून कुस्ती सारख्या खेळाकडे वळावे….
कुस्ती मैदानात एकनाथबापू शिंगणे यांचे प्रतिपादन..

बुलढाणा

देऊळगाव मही : युवकांनी व्यसनधिनता टाळून कुस्त्यांसारखे पारंपारिक मैदानी खेळाकडे वळावे असे प्रतिपादन कुस्तीच्या मैदानातून ज्येष्ठ नेते एकनाथबापू शिंगणे यांनी केले.
नंदी महादेव संस्थान टेकडीवर गुढीपाडवा चैत्रउत्सवा निमित्ताने सालाबादप्रमाणे कुस्तीची दंगल यावर्षी भरविण्यात आली होती.ह्या कुस्त्यांच्या मैदानातून युवकांना संदेश देताना राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते श्रद्धा फर्टीलायझरचे संचालक एकनाथबापू शिंगणे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा तरुण हा दारू बिडी सिगारेट तंबाखू गुटखा जुगार सोबतच ऐनराईड, सोशल मीडिया यासारख्या महाभयंकर व्यसनापासून मुक्त झाला पाहिजे, युवकांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती असलेले मैदानी खेळा चे आकर्षण निर्माण व्हावे म्हणून गावकऱ्यानी नंदी महादेव टेकडी संस्थांन च्या भव्य प्रांगणात कुस्त्यांचे फड आयोजीत करण्यात आले. या कुस्त्याच्या माध्यमातून काही प्रमाणात जरी तरुण व्यसनाधीनतेपासून दूर जाऊन मैदानी खेळाकडे वळाला तर या स्पर्धेचे चिज झाल्याशिवाय राहणार नाही असा सामाजिक संदेश त्यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना दिला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, रा.कॉ. नेते गजानन पवार,संचालक शंकरदादा शिंगणे, तुकाराम महाराज शिंगणे ,युवा उद्योजक अभयशेठ कोटेचा, शिवसेना नेते गणेशराव शिंगणे,रा.कॉ.नेते मन्नान पठाण, भाजपा नेते गणेश नागरे, सरपंचपती वसुदेव शिंगणे, गजानन चेके,संजय शिंगणे, भास्कर शिंगणे, उमेश शिंगणे,सुभाष शिंगणे,भगवान शिंगणे, शेतकरी नेते शेख जुल्फेकार, दशरथ चेके, प्रशांत शिंगणे, राजेंद्र शिंगणे, कडुबा शिंगणे, बळीराम शिंगणे, श्रीकृष्ण शिंगणे, सिद्धू भाऊ शिंगणे, रमेश नाना शिंगणे, मोहम्मद कलीम, संदीप राऊत,राजू आमदार, दत्ता शिंगणे, प्रमोद शिंगणे, विष्णू टेकाळे, शिवाजी शिंगणे, बाळू शिंगणे,गजानन तांदळे, यांच्या असंख्य कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या