29.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

तिरुपतीत बुलढाणा अर्बन भक्त निवासात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…*

तिरुपती..

*तिरुपतीत बुलढाणा अर्बन भक्त निवासात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…*

तिरुपती : आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे असलेल्या बुलढाणा अर्बन भक्त निवासात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी तिरुपतीला दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांनी श्रीराम प्रभूंची विधिवत पूजा-अर्चा करून दर्शन घेतले.


श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भक्त निवास परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भजन, कीर्तन आणि रामनामाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला आणि श्रीरामाच्या चरणी प्रार्थना अर्पण केल्या.
यावेळी बुलढाणा अर्बन भक्त निवासाचे संचालक मोहन जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाने पुढाकार घेत कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. त्यांच्या समन्वयातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्त निवास परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

ताज्या बातम्या