23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा 2026 पुण्यात उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…* *पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीराम रसाळ यांची ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कारासाठी निवड…*

बुलढाणा ब्रेकिंग

*महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा 2026 पुण्यात उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…*

*पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीराम रसाळ यांची ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कारासाठी निवड…*

सेवाश्री सामाजिक फाउंडेशन, इंटरनॅशनल पोलिस फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा रविवार, दि. 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत टी.जे. कॉलेज दत्ताजी गायकवाड सभागृह येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून, प्रमुख उपस्थितीत जनरल जी.एम. डॉ. जसबीर सिंग, सुबेदार महेंद्र गवई, भीमाशंकर कापसे, आनंद छाजेड व प्रा. पी. व्ही. अंतुरकर यांचा समावेश आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शीतल राणधीर, दिग्दर्शक हेमंत थोरात व उद्योजक लिलेश मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा. श्रीराम बळीराम रसाळ यांची “महाराष्ट्र रत्न पुरस्कार”ासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सेवाश्री सामाजिक फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

ताज्या बातम्या