23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्ह्यात शिक्षक पदोन्नती प्रक्रिया वेगात; माहिती तपासणीसाठी 2 एप्रिल अंतिम दिवस..* *सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांसह सर्वांना सूचना; अपूर्ण कागदपत्रे 3 एप्रिलपूर्वी जमा करण्याचे आदेश…*

बुलढाणा

*बुलढाणा जिल्ह्यात शिक्षक पदोन्नती प्रक्रिया वेगात; माहिती तपासणीसाठी 2 एप्रिल अंतिम दिवस..*

*सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांसह सर्वांना सूचना; अपूर्ण कागदपत्रे 3 एप्रिलपूर्वी जमा करण्याचे आदेश…*

बुलढाणा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक पदोन्नती प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून सर्व पात्र शिक्षकांना आपली माहिती तातडीने तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 च्या निर्णयानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासननिर्णयानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे.
याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदोन्नती पात्र शिक्षकांनी यापूर्वीच आपली आवश्यक माहिती संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात सादर करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे, 30 मार्च 2026 रोजी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाही ही माहिती सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
आता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व शिक्षकांनी 2 एप्रिल 2026 रोजी स्वतः गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून सादर केलेल्या माहितीची पडताळणी करावी. माहितीमध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास ती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी.
यासोबतच, ज्या शिक्षकांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत ती संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया कालमर्यादित असल्यामुळे सर्वांनी तातडीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही पात्र शिक्षकाचे नाव पदोन्नती यादीतून वगळले जाणार नाही यासाठी सर्व संबंधितांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या