बुलढाणा ब्रेकिंग
बुलढाण्यात जिल्हाधिकारी पदावर मोठा बदल; किरण पाटील यांची बदली, डॉ. प्रविण देवरे नवीन जिल्हाधिकारी…
पुण्यात बदलीनंतर पाटील यांचा निरोप, पुण्यातूनच देवरे यांची बुलढाण्यात नियुक्ती
बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा बदल झाला असून जिल्हाधिकारी पदावर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली पुणे येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. प्रविणकुमार देवरे यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत आदेश शासनाकडून प्राप्त झाले असून या बदलामुळे जिल्हा प्रशासनात नवीन नेतृत्वाची सुरुवात होणार आहे. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे व प्रशासनिक निर्णयांमुळे ठसा उमटवला होता. त्यांच्या बदलीमुळे प्रशासनात काही प्रमाणात बदल होणार असला तरी कामकाज सुरळीत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डॉ. प्रविणकुमार देवरे हे पुणे येथून बुलढाण्यात जिल्हाधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासकामांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बदलामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनात नव्या धोरणांची अंमलबजावणी आणि गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



