23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

तिरुपती येथे बुलढाणा अर्बनचे भाविकांसाठी भक्त निवास; सहकार मंत्र्यांची भेट….* *महाराष्ट्रीयन भाविकांसाठी उत्तम सोय-सुविधा व भोजन व्यवस्था; मंत्र्यांनी घेतला आढावा….*

तिरुपती

*तिरुपती येथे बुलढाणा अर्बनचे भाविकांसाठी भक्त निवास; सहकार मंत्र्यांची भेट….*

*महाराष्ट्रीयन भाविकांसाठी उत्तम सोय-सुविधा व भोजन व्यवस्था; मंत्र्यांनी घेतला आढावा….*

तिरुपती येथील तिरुपती बालाजी मंदिर परिसरात बुलढाणा अर्बन संस्थेच्या वतीने भाविकांसाठी सुसज्ज भक्त निवास उभारण्यात आला असून महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी येथे उत्कृष्ट सोय-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाविकांना नाममात्र दरात स्वच्छ व चविष्ट महाराष्ट्रीयन भोजनाची सुविधा देखील येथे दिली जात आहे.
या भक्त निवासाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिनांक 03 एप्रिल 2026 रोजी भेट दिली. यावेळी संस्थेच्या तिरुपती येथील भक्त निवासाचे इन्चार्ज  यांनी शाल व श्रीफळ देऊन मंत्र्यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान मंत्र्यांनी भक्त निवासातील सुविधा, स्वच्छता व व्यवस्थापनाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी येथे उपलब्ध करून दिलेल्या महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केले. भाविकांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत “अशा सुविधा महाराष्ट्रातील भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत,” असे मत व्यक्त केले.
बुलढाणा अर्बनच्या या उपक्रमामुळे तिरुपती येथे येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना मोठा दिलासा मिळत असून भविष्यात अशा सेवांचा अधिक विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या