15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

चिखलीत शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा; विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश..* *”गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” उपक्रमाला सुरुवात; आ. संजय गायकवाड यांचा भाजपावर जोरदार निशाणा…*

बुलढाणा ब्रेकिंग

*चिखलीत शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा; विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश..*

*”गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” उपक्रमाला सुरुवात; आ. संजय गायकवाड यांचा भाजपावर जोरदार निशाणा…*

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भाजप, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड व खासदार प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली असून, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीका करताना सांगितले की, बुलढाण्यात फारसे प्रवेश भाजपात झाले नाहीत, उलट चिखलीतील शिवसैनिकांना त्रास दिला गेला. त्यामुळे आता चिखलीत मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश सुरू झाला असून, हा सपाटा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले…

 

Related Articles

ताज्या बातम्या