- बुलढाणा ब्रेकिंग
*डोणगाव परिसरात विधवा शेतकरी महिलांसाठी मोफत नांगरणी उपक्रम सुरु…*
*सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टकडून १ हेक्टर (२.५ एकर) शेतीस मदतीचा हात..*

-
डोणगाव परिसरातील विधवा व अल्पभूधारक शेतकरी महिलांना दिलासा देण्यासाठी सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पात्र महिलांना १ हेक्टर (म्हणजेच २.५ एकर) शेतीची मोफत नांगरणी करून देण्यात येत आहे … या योजनेसाठी लाभार्थी महिला डोणगाव परिसरातील असावी, ती अल्पभूधारक असावी तसेच तिच्याकडे उत्पन्नाचे अन्य साधन नसावे. याशिवाय संबंधित महिलेची मुले १० वीच्या आत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे… हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वावर राबविण्यात येत आहे त्यानुसार लाभार्थी विधवा महिलांच्या शेतात नांगरणी सुरु केली आहे..



