बुलढाणा
शेगाव शहरात IPL सट्ट्यावर पोलिसांची कारवाई; ५ मोबाईलसह मुद्देमाल जप्त
शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून सट्टा खेळणाऱ्या दोन इसमांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व. श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने करण्यात आली.
हैदराबाद व पंजाब संघांदरम्यान सुरू असलेल्या IPL सामन्यावर मोबाईल फोनद्वारे पैशांची हार-जीत लावून सट्टा खेळताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५ मोबाईल फोन, ८०० रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १९,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई API यशोदा कणसे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे, सतीश मुळे, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे व समाधान टेकाळे यांच्या पथकाने केली.



