12.3 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

अल्पभूधारक शेतकरी कन्येची मोठी झेप – दिव्या जाधवची मुंबई लोहमार्ग पोलिसात निवड… जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश; गावात सत्कार करून गौरव

बुलढाणा

अल्पभूधारक शेतकरी कन्येची मोठी झेप – दिव्या जाधवची मुंबई लोहमार्ग पोलिसात निवड…

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश; गावात सत्कार करून गौरव

जळगाव जामोद तालुक्यातील घाटपळशी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील कन्या कु. दिव्या समाधान जाधव हिने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन करत मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
दिव्या ही शेतकरी श्री समाधान कडुसिंग जाधव यांची कन्या असून अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत तिने हे यश मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख श्री गजाननराव वाघ तसेच युवासेनेचे संपर्क प्रमुख संकेत रहाटे यांनी तिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विभाग प्रमुख दिपक घाईट पाटील, समाधान जाधव, अजिंक्य घाईट, रामदास जाधव, विनायक घाईट, ब्रम्हनंद घाईट, सुपेश मुलांडे, मोहन घाईट, हर्षल राजपूत, अमोल जाधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता सातत्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे दिव्याने हे यश संपादन केले आहे. तिचा संघर्षमय प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या