5.6 C
New York
Sunday, April 26, 2026

Buy now

spot_img

डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागल्याने खून; बुलढाण्यात वाढत्या ध्वनीप्रदूषणावर प्रश्नचिन्ह..*

बुलढाणा ब्रेकिंग

 

*डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागल्याने खून; बुलढाण्यात वाढत्या ध्वनीप्रदूषणावर प्रश्नचिन्ह..*

*सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली; डीजेवर बंदीची सुज्ञ नागरिकांची मागणी..*

 

बुलढाणा जिल्ह्यात डीजेच्या गाण्यावर नाचताना झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे डीजे संस्कृती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, वाढत्या ध्वनीप्रदूषणासह कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डीजेचा आवाज मर्यादित (सुमारे 40 डेसिबल) ठेवण्याचे निर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र 100 डेसिबलपेक्षा जास्त कर्कश आवाजात डीजे वाजविले जात असल्याचे चित्र आहे. नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, डीजे चालकांकडून कोणताही कायद्याचा धाक न ठेवता बिनधास्तपणे ध्वनीप्रदूषण केले जात आहे. पोलीसांकडून काही ठिकाणी कारवाई केली जात असली तरी, स्थानिक राजकीय दबाव आणि फोनमुळे कठोर कारवाई करण्यात अडथळे येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नियम असूनही त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही.

दरम्यान, अल्पवयीन व तरुणांमध्ये डीजेच्या तालावर नाचण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गर्दीत होणारी किरकोळ धक्काबुक्की अनेकदा वादाचे कारण ठरते. हेच वाद पुढे बाचाबाची, हाणामारी आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याने समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, डीजेमुळे वाढणारे गुन्हे आणि ध्वनीप्रदूषण लक्षात घेता डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या