7.6 C
New York
Monday, April 27, 2026

Buy now

spot_img

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; उद्याच्या मोर्च्यावरून शिंदेसेनेचा इशारा

बुलढाणा ब्रेकिंग

*“‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; उद्याच्या मोर्च्यावरून इशारा”*

*“बुलढाण्यात तणावाची शक्यता; कायदा-सुव्यवस्था राखण्याचे प्रशासनाला निवेदन”*

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बुलढाण्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पुस्तकाचे शीर्षक बदलावे, अन्यथा त्यावर बंदी आणावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी केली आहे.
उद्याच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाचे स्वागत असल्याचे सांगत, मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज असा सन्मानपूर्वक उल्लेख करूनच पुस्तकाचे वाचन करावे, अशी अटही त्यांनी घातली आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळत असल्याचा दावा करत, जर आमदार गायकवाड यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य झाले तर त्याला मोर्च्यातच जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजपूत यांनी दिला आहे. उद्या कोल्हापूरहून प्रशांत आंबी व आमदार रोहित पवार बुलढाण्यात येऊन आमदार गायकवाड यांच्या घरासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाचन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन सादर केले.

 

जिजा राठोड, महिला जिल्हाप्रमुख, शिंदे गट शिवसेना

Related Articles

ताज्या बातम्या