- बुलढाणा..
मोताळा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा..
रुग्णालयात डॉक्टर आणि एम्बुलन्स उपलब्ध नसल्याने रुग्णाला खाजगी वाहनाने बुलढाण्याकडे घ्यावी लागली धाव…
25 किमी जीवघेणा प्रवास..
उपचाराअभावी रुग्णाची फरफट.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार ..

-
-बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे आरोग्य व्यवस्थेचा गंभीर बोजवारा उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. सारोळा पीर येथील गणेश किसन गावंडे या अत्यावस्थ रुग्णाला उपचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता, तेथे ना वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, ना तातडीची सेवा उपलब्ध होती.. रुग्णालयात कोणीही जबाबदार कर्मचारी नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी दमछाक झाली.. परिस्थिती इतकी गंभीर होती की, रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविणे अत्यावश्यक होते.. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला..नाईलाजास्त त्यांनी खाजगी वाहनाचा आधार घेत रुग्णाला तब्बल 25 किमी अंतरावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे हलवले.. या दरम्यान काही अनुचित घडले असते तर त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.. विशेष म्हणजे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे..



