11.4 C
New York
Saturday, May 2, 2026

Buy now

spot_img

महाराष्ट्र दिनी 7 शासकीय रुग्णालयांत MRI सेवा सुरू; वर्षानुवर्षे धुळखात पडलेले सेंटर अखेर रुग्णांसाठी खुले…

बुलढाणा ब्रेकिंग

महाराष्ट्र दिनी 7 शासकीय रुग्णालयांत MRI सेवा सुरू; वर्षानुवर्षे धुळखात पडलेले सेंटर अखेर रुग्णांसाठी खुले…

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; जालना येथील MRI सेंटर तांत्रिक कारणामुळे अद्याप रखडले..


राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा निर्णय अखेर प्रत्यक्षात येत आहे. राज्यातील एकूण आठ शासकीय रुग्णालयांपैकी सात रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेली MRI (एमआरआय) सेंटर आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले आहे.
भंडारा, अमरावती, बुलढाणा, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ही अत्याधुनिक MRI सुविधा आता रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, ही सेंटर अनेक वर्षांपासून तयार असूनही विविध कारणांमुळे सुरू होऊ शकली नव्हती आणि अक्षरशः धुळखात पडली होती. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या MRI तपासण्या कराव्या लागत होत्या. आता या सुविधेच्या सुरूवातीमुळे ग्रामीण आणि सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, कमी खर्चात अत्याधुनिक निदान सेवा मिळणार आहे.
दरम्यान, जालना येथील शासकीय रुग्णालयातील MRI सेंटर काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू होऊ शकले नसून, त्याचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते.
विशेष बाब म्हणजे, “SNTV न्यूज” ने या बंद पडलेल्या MRI केंद्रांच्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने याची दखल घेत ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने माध्यमांच्या पाठपुराव्यालाही यश आले आहे….

Related Articles

ताज्या बातम्या