14.7 C
New York
Friday, May 15, 2026

Buy now

spot_img

पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचा संताप…* *महागाईच्या झळा अधिक तीव्र*

बुलढाणा ब्रेकिंग

*पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचा संताप…*

*महागाईच्या झळा अधिक तीव्र*

*इंधन दरवाढीमुळे नागरिक चिंतेत; श्रीमंत-गरीब दरी वाढत असल्याची प्रतिक्रिया..*

अँकर
देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच गॅस सिलेंडर तसेच सोने-चांदीच्या वाढत्या दरांमुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असताना आता इंधन दरवाढीने आणखी भर पडली आहे. दररोज इंधनाचे दर वाढत राहतील की काय, अशी शंका सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, शेती, किराणा तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होणार असल्याने महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या भरडला जात असून श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत बेरोजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांनी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या