बुलढाणा ब्रेकिंग
*मुंबईतील युवा एकदिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी गोपाल मापारी यांची निवड…*
*साहित्य व गझल क्षेत्रातील योगदानाची दखल; युवा पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून गौरव..*
मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या युवा एकदिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा गझलकार तथा साहित्यिक गोपाल मापारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य आणि गझल विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोपाल मापारी यांनी आपल्या संवेदनशील लेखणीतून आणि प्रभावी गझल सादरीकरणातून अल्पावधीतच साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेची दखल घेत आयोजकांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. युवा गझल संमेलन हे गझलप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून नवोदित गझलकारांना व्यासपीठ मिळणार असून साहित्यिक संवादाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गोपाल मापारी यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळे तरुण साहित्यिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत….



