24 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कळुळे यांच्याकडून जनगणना कामाची पाहणी…

बुलढाणा

निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कळुळे यांच्याकडून जनगणना कामाची पाहणी…

देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथे प्रत्यक्ष भेट देत जनगणना प्रक्रियेचा घेतला आढावा

देशाच्या आणि राज्याच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जनगणना मोहिमेची देऊळगाव राजा तालुक्यात वेगाने अंमलबजावणी सुरू असून, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कळुळे यांनी नुकतीच तालुक्यातील निमखेड येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाची सविस्तर पाहणी केली.
यावेळी त्यांनी गावातील विविध कुटुंबांना भेट देत जनगणना प्रक्रियेचा आढावा घेतला. निमखेड येथे नियुक्त प्रगणक सौ. रंजना देशमुख या नागरिकांची माहिती नोंदविण्याचे काम करत होत्या. नागरिकांकडून माहिती कशा प्रकारे संकलित केली जाते तसेच डिजिटल प्रणालीवर नोंदी अचूकपणे कशा केल्या जात आहेत, याची बारकाईने पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली.
जनगणना ही भविष्यातील शासकीय योजना, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा आधार असल्याने प्रत्येक कुटुंबाने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोणतीही माहिती न लपवता अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रगणक सौ. रंजना देशमुख यांनी नागरिकांशी संवाद साधत अत्यंत जबाबदारीने व तत्परतेने माहिती संकलन केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कळुळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक अडचणी जाणून घेत जनगणनेचे काम योग्य गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यात महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या