31.3 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला बुलढाण्यात तीव्र विरोध; आंबेडकरी समाज आक्रमक

बुलढाणा ब्रेकिंग

*अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला बुलढाण्यात तीव्र विरोध; आंबेडकरी समाज आक्रमक..*

*२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार; संविधानिक हक्क अबाधित ठेवण्याची मागणी..*

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बुलढाणा जिल्ह्यात आंबेडकरी समाज व विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. बुधवारी आयोजित चिंतन बैठकीत मान्यवरांनी उपवर्गीकरण हे संविधानविरोधी असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षण व अधिकारांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला बुलढाण्यातूनही मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आंबेडकरी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या