बुलढाणा ब्रेकिंग
*नांदुराचे नगरसेवक मोहम्मद फुरकान मेमन यांना मानद डॉक्टरेट प्रदान…*
*सामाजिक कार्य व राजकारणातील योगदानाची दखल; दिल्लीतील भव्य सोहळ्यात झाला सन्मान…*
नांदुरा नगर परिषदेचे नगरसेवक मोहम्मद फुरकान मेमन यांना सामाजिक कार्य आणि राजकारण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात Iconic Peace Award Council तर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या प्रतिष्ठित सन्मानामुळे नांदुरा शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोहम्मद फुरकान मेमन यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना विविध सामाजिक उपक्रम, जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच लोकहिताच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. मानद डॉक्टरेट स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना मोहम्मद फुरकान मेमन यांनी हा पुरस्कार नांदुरा शहरातील नागरिक, समर्थक, सहकारी आणि शुभेच्छुकांना समर्पित केला. हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून समाजसेवा आणि जनहितासाठी आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही समाजहितासाठी त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



